Wednesday, 17 February 2010

नाटकवेडी मुले





शिरगाव ,ता. देवगड, जिल्हा सिंधूदूर्ग हे कोकणातले छोटंसं खेडं . इथली मुलं गेली २० वर्षे नाटक करतायत . दर वर्षी एक नवं कोरं नाटक ऊभं रहातंय . ही मुलं नाटक पुढे घेऊन जात आहेत. हे नाटक महाराष्ट्रातल्या अनेक नाट्यकर्मींना,रसिकांना व समीक्षकांना आवडतंय . नवे विषय, नव्या भूमिका , नवी आव्हानं स्वीकारताना मुलांचा नाटकाचा अभ्यास चालू आहे. दर वर्षी ऑक्टोंबर ते जानेवारी या चार महिन्यात ही धमाल सुरू असते. मे च्या मोठ्या सुट्टीत नाटक पुन्हा मुलांना भेटतं.अनेकांनी नाटकाप्रमाणं सिनेमातही कामं केलीयत . मानाचे पुरस्कार पटकावलेत . मुलांबरोबर फ्रेंड सर्कल मधली तरूण मंडळी , शाळेतले शिक्षक या जत्रेत सामील आहेत.पालकांनाही हा एक सुंदर अनुभव आहे . तूर्तास एवढंच .पुढे आणखी बोलूयात .

1 comment:

  1. Great to know about the happenings. I am proud to belong to the same Panchakroshi. Will send the blog address to Bhaimama. He is presently in the USA.

    Natak Vedya Muleana khup khup Shubhechcha.

    Vasudha Kamat

    ReplyDelete

 

avandia